Varun Dhawan's Wedding | वरूण धवन आणि नताशा दलाल उद्या विवाह बंधनात अडकणार!

Varun Dhawan Wedding अवघ्या काही तासांमध्येच अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण नताशा दलाल (Natasha Dalal) विवाहबंधनात अडकणार आहेत. या विवाहसोहळ्यासाठी नताशा आणि वरुणनं परदेशवारीला जाण्याऐवजी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि अनेकांच्याच पसंतीच्या अशा अलिबाग या ठिकाणाला पसंती दिली आहे.

अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या या ठिकाणी एका आलिशान बीच रिसॉर्टमध्ये हा सेलिब्रिटी विवाहसोहळा पार पडणार आहे. ज्यासाठी मोबाईल वापराबाबचे निर्बंध असणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही टीकून असल्यामुळं त्या धर्तीवर या विवाहसोहळ्यातही काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करण्यात आल्याचं कळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola