शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ; दोघांविरोधात धमकी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. धमकी आणि फसवणूकीचा आरोप करत नितीन बरई यांनी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय. नितीन बरई यांच्या आरोपानुसार, २०१४ मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह मिळून काशीफ खानने १ कोटीची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. काशीफ खान हे SFL फिटनेस प्रायवेव्ह लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. काही कारणांनी व्यवसाय सुरळीत चालत नसल्याने नितीन यांनी पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झालीये. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola