Sooryavanshi on Netflix : सूर्यवंशी लवकरच नेटफ्लिक्सवर, बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई...
सूर्यवंशी हा चित्रपट लवकरच ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचे हक्क जवळपास 100 कोटी रुपयांना विकले असल्याची माहिती समोर आलीये.४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतोय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जादू करणारा हा चित्रपट आता ओटीटी नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलीये.