Salman Khan : सलमान खानला तुर्तास दिलासा, कोर्टात हजर राहण्यापासून मिळाली सुट
2019 मध्ये पत्रकाराशी झालेल्या वादानंतर, सलमान खानवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आता 9 मे रोजी सुनावणी होणार आहे.या प्रकरणी अंधेरी न्यायालयानं सलमान खानला आज हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं.. दरम्यान सलमानला आज न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळाली. दरम्यान हा गुन्हा रद्द करावा म्हणून सलमान खाननं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2019 मध्ये सलमान खान मुंबईच्या रस्त्यावरुन सायकल चालवत असताना एका पत्रकारानं त्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं धमकावलं आणि हात उगारला असा तक्रारदार पत्रकाराचा आरोप आहे. पत्रकाराच्या तक्रारीनंतर सलमान खान आणि सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..