Salman Khan Firing case : ज्या पिस्तुलानं सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं...

Continues below advertisement

Salman Khan Firing Case :  बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्यावरील हल्ल्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. पनवेल पोलिसांनकडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. या चौघांनी सलमान खानच्या कारवर पनवेलमध्येच हल्ला करण्याचा कट आखला होता. या कटाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे. 

14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यानंतर  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगवान तपास करत आरोपींना अटक केली. आता पनवेल पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधील शस्त्र पुरवठा करणाऱ्याकडून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न होता. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.  धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि झिशान खान उर्फ जावेद खान अशी चार अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram