Sunny Deol : सनी देओलविरोधात फसवणूकीचा गंभीर आरोप, निर्मात्याने दाखल केली तक्रार ABP Majha

Continues below advertisement

Sunny Deol Accused of Cheating and Extortion :  बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. फसवणूक आणि खंडणी वसुलीचा आरोप सनी देओलवर करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता सौरव गुप्ता याने सनी देओल विरोधात फसवणूक, खंडणी वसुलीची तक्रार दाखल केली आहे.  चित्रपट निर्माते झालेले रिअल इस्टेट डेव्हलपर असलेले सौरभ गुप्ता यांनी हे आरोप केले आहेत.  सनी देओल यांनी चित्रपटात काम करायचे आहे म्हणून पैसे घेतले पण चित्रपट केला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

सौरव गुप्ता यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, 2016 मध्ये त्यांनी आपल्या चित्रपटासाठी सनी देओलसोबत मुख्य भूमिकेसाठी 4 कोटींची डील केली होती. यातील एक कोटींची रक्कम अॅडव्हान्स दिले होते. मात्र, त्यांनी आमचा चित्रपट पूर्ण करण्याऐवजी पोस्टर बॉईज (2017) या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याचा पर्याय निवडला. अॅडव्हान्स रक्कम देऊनही सनी देओल माझ्याकडून अधिक पैशांची मागणी करत राहिला. माझे दोन कोटी 55 लाख रुपये सनी देओलच्या खात्यात असल्याचे दावा गुप्ता यांनी केला. सनी देओल यांनी मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितले होते असा दावाही त्यांनी केला. 

सनी देओलवर गंभीर आरोप... 

निर्माते सौरव गुप्ता यांनी सांगितले की, सनी देओलने 2023 मध्ये माझ्या कंपनीसोबत एक बनावट करार केला होता. जेव्हा आम्ही हा करार केला तेव्हा त्या करारनाम्यातील मधले पानही बदलण्यात आले होते. त्या 
ठिकाणी चित्रपटात काम करण्याच्या मानधनाची रक्कम 4 कोटींहून 8 कोटी करण्यात आली. तर, नफा दोन कोटी करण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram