Saif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवाना

Continues below advertisement

 अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावरील हल्ला प्रकरणात एका संशयीत व्यक्तीला  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जाईल. जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे.  मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती. 

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीला मध्यरात्री सव्वा दोन ते अडीच्या दरम्यान एका व्यक्तीनं हल्ला केला होता. त्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथकं तयार केली होती. मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत वांद्रे पोलीस स्टेशनला नेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हाच आहे का याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram