NCB summons actor Arjun Rampal | अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीचं पुन्हा समन्स

Continues below advertisement
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव ड्रग केसमध्ये समोर आलं होतं. यासंदर्भात त्याची चौकशीही करण्यात आली होती. आता एनसीबीने पुन्हा एकदा अर्जुन रामपाल समन्स बजावलं आहे. एनसीबीने 16 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ड्रग कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची याआधी चौकशी झाली करण्यात आली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूड ड्रग कनेक्शन समोर आलं होतं. सध्या एनसीबी याप्रकरणी कसून तपास करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram