Javed Akhtar backs Aryan Khan : गीतकार जावेद अख्तर आर्यन खानच्या पाठीशी ABP Majha
Continues below advertisement
शाहरुख आणि आर्यन खानच्या मदतीला गीतकार जावेद अख्तर धावून आले आहेत. बॉलिवूडला टार्गेट केलं जात असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. मुंबईत चेंजमेकर्स या पुस्तकाचं प्रकाशन जावेद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जावेद अख्तर यांनी हे वक्तव्य केलं आहे. अदानी पोर्टवर हजारो कोटींचं ड्रग्ज सापडलं मात्र या बातमीची दखल मीडियाकडून घेतली गेली नाही असाही आरोप जावेद अख्तर यांनी केलाय. सेलिब्रेटी असल्यानं शाहरुखला त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचही अख्तर यांनी टीपण्णी केलीय.
Continues below advertisement