Kangana Copyright Violation | लेखकाची कथा चोरल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement

अभिनेत्री कंगना रनौत आणखी एका वादात सापडलीय. एका लेखकाची कथा चोरल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणूक आणि कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतर्गत हा गुन्ह्याची नोंद झाली आहे. तक्रारदार लेखक आशिष रतनलाल कौल यांनी द लिजेंड ऑफ दिद्दा हे पुस्तक लिहिलंय. कौल यांनी आपल्या या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांनी याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली.

मात्र ही घोषणा करण्याआधी कंगनाने परवानगी घेतली नाही असा आरोप कौल यांनी केलाय. त्यामुळे त्यानंतर कौल यांनी वांद्रे इथल्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram