Sahitya Akademi Award | ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला
नागपूरचे ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिलाय. नंदा यांनी पुरस्कारासाठी धन्यवाद मानलेत पण समाजानं भरपूर दिलंय असं सांगत पुरस्कार नाकारला. 2014 मध्ये "उद्या" ही कादंबरी प्रकाशित झाली... आणि आज त्याच कादंबरीसाठी नंदा खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. पण त्यांनी पुरस्कार नाकारलाय