Sanjay Dutt diagnosed with lung cancer | अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. त्याच्या आयुष्यावर चित्रपट निघावा असं त्याचं आयुष्य आहे आणि तसा चित्रपट निघालाही. अनेक अडचणींचा सामना करुन संजय दत्त स्थिर झाला होता. त्यात आता एक दुख:द माहिती समोर आली आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola