Shahrukh Khan च्या मन्नतवर आकर्षक रोषणाई! दिवाळी आणि शाहरुखच्या जन्मदिनाचं निमित्त!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShahrukh Khan B'day: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) चा आज वाढदिवस आहे. किंग खानने आज 56 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते सकाळपासून मन्नतच्या बाहेर उभे आहेत. पण आज शाहरुख चाहत्यांना भेटू शकत नसल्याचे दिसत आहे.
शाहरुख खान (Shahrukh Khan) आज वाढदिवसाला मुंबईच्या बाहेर आहे. बंगल्यातील सुरक्षारक्षक शाहरुखच्या चाहत्यांना सांगत आहेत,"शाहरुख घरी नसल्याने तुम्ही घरी जा". शाहरुख त्याचा वाढदिवस अलिबागमध्ये कुटुंबियांसोबत साजरा करतो आहे. त्यामुळेच पोलिसदेखील चाहत्यांना मन्नतबाहेर थांबवत नाही आहेत. शाहरुखच्या मॅनेजरने शाहरुख घरी नसल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे. दरवर्षी मन्नतबाहेर चाहते शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी मन्नतबाहेर येत असतात. शाहरुखदेखील त्याच्या बालकणीत उभा राहून चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतो.