Ananya Marathi Film Review :कसा आहे Hruta Durgule चा नवा सिनेमा अनन्या? Film Review by Vinod Ghatge

Continues below advertisement

Ananya Movie Review : काही कथा या विशिष्ट माध्यमातच जास्त प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात, किंबहुना त्यांचा जन्मच ठराविक माध्यमासाठी झालेला असतो. त्यांचं माध्यमांतर झालं तर मूळ कलाकृतीला धक्का लागू शकतो किंवा त्यातली गंमत कमी होऊ शकते. 

'अनन्या' मात्र याला अपवाद ठरलीय. एकांकिका म्हणून ती लोकांना जेवढी आवडली, दोन अंकी नाटक म्हणून जेवढी भावली तितक्याच समर्थपणे ती रुपेरी पडद्यावर साकारली गेली आहे. 

खरं तर माध्यमांतर करताना सगळ्यात महत्वाचं असतं ते लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं गोष्टीवरचं नियंत्रण. रंगभूमीच्या मर्यादित अवकाशाला जेव्हा रुपेरी पडद्याचा कॅनव्हास मिळतो तेव्हा ती गोष्ट भरकटण्याची जास्त शक्यता असते. जे रंगभूमीवर करता आलं नाही ते सगळं कॅमेऱ्यासमोर साकारण्याचा मोह कोणालाही पडू शकतो आणि याच मोहात अडकून अनेक कलाकृतींची माती झालेली उदाहरणं आपल्या समोर आहेत. 

'अनन्या' सिनेमा मात्र खूपच नियंत्रित आणि कथेच्या गरजेइतक्याच चौकटीत बांधला गेलाय. त्यासाठीच लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रताप फडचं कौतुक करायलाच हवं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram