Amruta Fadnavis entry in Bigg Boss House : बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री
बिग बॉस मराठीच्या घरात दररोजच नवनवीन ट्विस्ट अँड टर्न येत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या बिग बॉस मराठी सिझन चारमधील १४ स्पर्धक घरात दिवाळी साजरी करत असले, तरी 'फटाके' फुटणं या घरासाठी नवीन नाही. त्यातच आता बिग बॉसने एक सरप्राईज एलिमेंट आणला आहे. बिग बॉसच्या घरात मिसेस अमृता फडणवीस यांची एन्ट्री झाली आहे. या मोठ्या ट्विस्टमुळे स्पर्धकही चक्रावून गेले आहेत.