Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ABP Majha
Amitabh Bachchan Covid 19 : बॉलिवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे," मी नुकतीच कोरोना चाचणी केली असून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी'.