Amazon Prime चं सबस्क्रीप्शन महागणार; वार्षिक प्लानसाठी 999 ऐवजी 1 हजार 499 रुपये मोजावे लागणार

फॅमिली मॅन, पंचायत, फोर मोअर शॉट्स प्लीज, मेड इन हेवन, हॉस्टेल डेझ, मुंबई डायरीज 26/11 या गाजलेल्या वेबसीरिजमुळे कायम चर्चेत राहिलेल्या.  OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमचं सबस्क्रीप्शन आता महागणार आहे. आता अमेझॉन प्राईमची वार्षिक मेंबरशिप घेण्यासाठी चाहत्यांना 1 हजार 499 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी त्यासाठी 999 रुपये मोजावे लागत होते. यासोबतच अॅमेझॉनकडून दर महिना शुल्क 179 रुपये आणि 3 महिन्यांच्या मेंबरशिप शुल्कात 329 रुपयांवरुन 459 रुपयेइतकी वाढ करण्यात येईल. अॅमेझॉन प्राईमचं सदस्यत्व असणाऱ्यांना कंपनीकडून ऑनलाईन खरेदी केल्यास एका दिवसातच वस्तूंची डिलिव्हरी तसेच अॅमेझॉन प्राईम व्हीडिओची सुविधा दिली जाते. पण ही सबस्क्रीप्शन शुल्कातली वाढ कधीपासून लागू होईल, त्याची तारीखही कंपनी लवकरच जाहीर करणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola