68th National Film Awards 2022 : 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला
68th National Film Awards 2022 : सिनेक्षेत्रात मानाचा समजल्या जाणारा '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा'चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.