Karnataka Assembly Election Live : रामदुर्गमधून कॉंग्रेसचे अशोक पट्टण आघाडीवर : ABP Majha

Continues below advertisement

कर्नाटकात काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना आजच बंगळुरुत बोलावण्यात आलंय. त्याचवेळी कर्नाटकातील राजकीय घटनांना वेग आला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि नेते सिद्धारमय्या यांना हायकमांडने आजच दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी या दोन नेत्यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती आहे. जे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालं ते कर्नाटकात होऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांडने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram