नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनातील गोंधळामुळे देशाला 190 कोटींचा फटका
Continues below advertisement
अर्थसंकल्पीय अधिवेशनात काडीचंही काम न करता सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे, देशाच्या तिजोरीला तब्बल 190 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. गेल्या 10 वर्षात अधिवेशनाच्या काळात सर्वात कमी कामकाजाची नोंदही या निमित्ताने झाली आहे. केवळ 22 वेळा लोकसभेचं कामकाज सुरळीत चाललं, ज्यातून केवळ 25 टक्के कामकाज झालं. तर राज्यसभेत केवळ 35 टक्के कामकाज पार पडलं.
Continues below advertisement