भारतावर आता कापूस आयात करण्याची वेळ येणार? | 712 | एबीपी माझा
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम भारतातील आयात-निर्यातीवर होत आहे. चीनने यंदा मोठ्या प्रमाणात भारताकडून कापसाची आयात केली आहे. देशांतर्गत कापसाचं उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना दरही चांगला मिळाला. मात्र आता हिच स्थिती बिकट होण्याच्या मार्गावर आहे. कमी उत्पादन आणि जास्त निर्यातीमुळे भारतालाच आता कापूस आयात करण्याची वेळ येईल अशी शक्यता निर्माण झालीय आहे. वर्षाच्या शेवटी भारताला २७ लाख गाठी कापसाची आयात करावी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे.