Breakfast Chat | दारुबंदीचा निर्णय घाईने घेतला, नवनिर्नाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांशी बातचीत | ABP Majha

Continues below advertisement
आज आपल्यासोबत एक असे आमदार आहेत ज्यांना कुठल्याही राजकीय घराणेशाहीची पार्श्वभूमी नसूनही ते ७३ हजारांच्या दणदणीत मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. त्यांचं नाव आहे चंद्रपूरचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवार. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात जोरगेवार यांनी भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या विजयाचा सोहळाही अनोखा होता. कारण, त्यांच्या गळ्यात घालण्यात आलेले सगळे हार त्यांनी त्यांच्या माऊलीच्या गळ्यात घातले आणि त्यांचा विजय आईला समर्पित केला. त्यामुळे, त्यांच्यासह सगळ्य़ा उपस्थितांचे डोळे पाणावले.
भाजप उमेदवार नाना श्यामकुळे आणि काँग्रेस उमेदवार महेश मेंढे यांच्यासोबत किशोर जोरगेवारांची लढत होती. या आव्हानाचा सामना करताना किशोर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. आणि १ लाख १६ हजार मतं मिळवली..किशोर यांच्या आई बांबू च्या वस्तू बनवतात. अशा परिस्थितीत आपला मुलगा आमदार झाल्याचा आनंद या माऊलीसाठी सगळ्यात मोठा आहे. किशोर यांनी हा विजय कसा साकार केला, त्यांचा संघर्ष कसा होता, त्यांना चंद्रपूरच्या विकासासाठी नेमकी कोणती कामं करायची आहेत याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत..सोबतच त्यांच्या मातोश्री गंगुबाई आपल्यासोबत आहेत. आपल्या दोघांचं स्वागत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram