VIDEO | भावं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना फुलं रस्त्यावर फेकायची वेळ | कल्याण | ABP Majha
Continues below advertisement
ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं अक्षरशः फेकून दिली आहेत. त्यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये रस्त्यांवर फुलांचा अक्षरशः खच पडला. राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळे फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. झाडांवरच ओली झालेली फुले बाजारात येईपर्यंत खराब व्हायला सुरुवात होत आहे. त्यामुळे या फुलांना 5 रुपये किलोच्या वर दर मिळत नसून यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेत.
Continues below advertisement