पुणे: खेळताना कार लॉक, गाडीत गुदमरुन चिमुकल्याचा मृत्यू
Continues below advertisement
पिंपरीजवळच्या चाकणमध्ये गाडीत गुदमरून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. करण पांडे अस या मुलाचं नाव आहे. सोमवारी करण मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता. दुपारी बाराच्या सुमारास उन्हात उभ्या असलेल्या इस्टिम गाडीत तो बसला. यावेळी गाडी लॉक झाली. तेंव्हापासून तो पावणे सहा तास गाडीत अडकला होता. भर दुपारचं ऊन आणि बंद काचा यामुळं तो गुदमरुन त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या वडीलांना मृतदेह गाडीत आढळून आला.
Continues below advertisement