सोनं तारण कर्जात 77% वाढ तर Credit Card वरची थकबाकी 1 लाख 11 हजार कोटींच्या घरात, Corona चा परिणाम
corona मुळे आर्थिक गणित कोलमडल्यानंतर गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात सामान्य माणसाचा कर्ज काढण्याकडे अधिक कल दिसून आला. सोनं तारण कर्जात 77% वाढ झाली असुन Credit Card वरची थकबाकी 1 लाख 11 हजार कोटींच्या घरात पोचली आहे.
भारतात सोने तारण कर्जात 77 टक्क्याची वाढ झाली आहे त्याशिवाय क्रेडिट कार्डावरील कर्जाची थकबाकी ही या कालावधीत 9.8 टक्क्यांनी वाढून दहा हजार कोटी रुपये वाढवून 1.1 11 लाख कोटी रुपये झाली आहे अचानक उद्भवलेल्या गरजा भागवण्यासाठी लोक साध्या व्याजदराने कर्ज घेण्याची जोखीम पत्करत असल्याचे दिसत आहे. जुलै 2019 ला संपलेल्या 12 महिन्याच्या कालावधीत भारतीय कंपन्या आणि सेवा क्षेत्राकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे प्रमाण कमी राहील परंतु या कालावधीत सोने तारण आणि क्रेडिट कार्ड व्यवसाय याच्या बळावर वैयक्तिक कर्जत मोठी वाढ झाली आहे. सोनेतारण कर्ज तब्बल 77 टक्क्यांनी वाढला आहे.