ब्रेकफास्ट न्यूज : केंद्र सरकारकडून इस्रोसाठी 10 हजार कोटींची तरतूद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी भरीव तरतूद केंद्र सरकारने केली आहे. नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून दहा हजार कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही या महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्रिमडळाने ही तरतूद केली आहे. हे दोन्ही प्रकल्प इस्रोचे बहुउद्देशीय कार्यक्रम आहेत. सध्या इस्रो पहिल्यावहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करत आहे.