ब्रेकफास्ट न्यूज : 'या सम हा' ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. सदानंद मोरे यांच्याशी संवाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डॉ. सदानंद मोरे यांनी लिहलेलं श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्राचं पुण्यात प्रकाशन झाल. सदानंद मोरे यांच्या 1990 सालच्या पोस्ट पी.एच.डी प्रबंधाचं ‘Krsna: The man and his mission’ ह्या पुस्तकाचं पौर्णिमा लिखिते ह्यांनी भाषांतर केलेलं ‘या सम हा’हे श्रीकृष्णाचं हे वैचारिक चरित्र परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ.शैलेंद्र देवळाणकर ह्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात पार पडलेल्या ह्या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
हा ग्रंथ श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आणि त्याचं चरित्र ह्यांच्यातल्या संबंधावर एक वेगळा प्रकाश टाकणारा आहे. श्रीकृष्णाचं देवत्व मान्य करून त्याच्या सगळ्या चरित्राकडे, त्यानं आचरणात आणलेल्या नीतीकडे पाहिलं, तर तो पूज्य आणि वंद्य ठरतो आणि मग आपण त्या घटनांना दैवी मानतो. याउलट त्याचं मनुष्यत्व मान्य केलं, तर त्याच्या तत्वज्ञानाकडे मानवी विचार म्हणून पाहता येतं आणि मग तो अनुकरणीय ठरतो. ह्याच गाभ्यावर आधारित हा ग्रंथ श्रीकृष्ण आणि महाभारताकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन या ग्रथांच्या माध्ममातून विकसित होतो.