कर्नाटक : कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू बंगळुरुत!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुमारस्वामींचा शपथविधी आज पार पडणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांच्या एकीचा ट्रेलर आज बंगळुरुत पाहायला मिळू शकतो. बंगरुळुत संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेते बंगळुरुत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीताराम येचुरी हे बंगळुरुत दाखल झाले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी हेसुद्धा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.