खेळ माझा : बीसीसीआयच्या मीडिया हक्कांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीसीसीआयच्या भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठी सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रिज या तीन समूहांची कोटीच्या कोटी उड्डाणं अजूनही सुरू आहेत. या हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत दुसऱ्या दिवसअखेर तब्बल १६०० कोटी रुपयांनी चढ्या भावात बोली आली. बीसीसीआयच्या ई-लिलाव प्रक्रियेत पहिल्या दिवशी आलेली अखेरची बोली ही ४४४२ कोटी रुपयांची होती. दुसऱ्या दिवसअखेर त्या बोलीला ६०३२ कोटी आणि ५० लाखांचा चढा भाव आला. येत्या पाच वर्षांत बीसीसीआयच्या यजमानपदाखाली कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी असे तिन्ही फॉरमॅट्सचे मिळून १०२ सामने होणार आहेत. त्यासाठीची ई-लिलाव प्रक्रिया उद्या तिसऱ्या दिवशीही सुरू राहणार आहे. पण दुसऱ्या दिवशी आलेल्या बोलीनुसार बीसीसीआयच्या एका आंतरराष्ट्रीय सामन्याला सध्या ५८ कोटी ८५ लाखांचा भाव आला आहे.