VIDEO | पंतप्रधान मोदी 2014 नंतर पहिल्यांदाच अयोध्येत, राम मंदिराबाबत मौन | अयोध्या | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं आहे. मोदींनी आपल्या भाषणात राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. इतकच नाही तर जय श्रीरामचा नाराही दिला. पण राम मंदिराबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. श्रीलंकेत आज जी स्थिती आहे, ती 2014 पूर्वी भारतात होती. गेल्या पाच वर्षात बॉम्बस्फोटासारख्या बातम्या येणं बंद झाल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना भारतात कमकुवत सरकार हवं असल्याचं सांगत मोदींनी देशात मजबूत सरकारची गरज व्यक्त केली.