Kishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवात

Continues below advertisement

Kishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवात पहिल्याच फेरीत निकाल माझ्या बाजूने येणार : किशोर दराडे  शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी म्हटले आहे की, शिक्षक बांधव माझ्यासोबत असल्याने निकालाची भीती नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने निवडणुकीत आरोप केले गेले. महायुतीचे नेते माझ्यासोबत होते त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. पहिल्याच फेरीत निकाल माझ्या बाजूने येणार असल्याचा विश्वास किशोर दराडे यांनी आहे. 

'अशी' होणार मतमोजणी 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram