अहमदनगर : तंबाखूचा तोबरा भरुन कोर्टात, पोलिसाला खराब भिंती पुसण्याची शिक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात तंबाखूचं सेवन करणार्या पोलिसाला कोर्टानेच चपराक लगावली. तोंडात तंबाखूचा तोबरा भरुन समोर आल्यामुळे संतप्त न्यायाधीशांनी न्यायालयातील खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा पोलिस हेड कॉन्स्टेबलला दिली. बबन गेणबाजी साळवे हे पोलिस हेड कॉन्स्टेबल एका खटल्यात साक्षीसाठी आरोपीला घेऊन आले होते. न्यायाधीशांसमोर जाताना त्यांनी तोंडात तंबाखूचा तोबरा भरला होता, त्यामुळे त्यांना बोलणंही अशक्य झालं. 'तोंडात काय आहे?' असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारल्यावर त्यांनी सुपारी असल्याचं सांगितलं. मात्र न्यायधीशांनी इतर पोलिसांना बोलावून पाहणी करण्यास सांगितलं. त्यावेळी पोलिसांनी साळवे यांच्या तोंडात तंबाखू असल्याचं सांगितलं.