Wardha Rain Update : पेरणीची घाई, अंगाशी येई; दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत
वर्ध्यात कपाशीच्या धूळ पेरण्या झाल्या, पण मृग नक्षत्राचा पाऊस मात्र पाहिजे तसा बरसला नाही. ओलिताची सोयच नाही ते शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दुबार पेरणीची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. शेतकरी महादेव पिसे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.
Maharashtra Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काह भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज राज्याच नेमकी काय परिस्थिती असले याबबातची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, मागील तीन चार दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क आहे. प्रशासनाने सगळी तयारी देखील केली आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेती कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.