7/12 च्या बातम्या : आता पीक समुहांसाठी 'लेबल क्लेम' पद्धत अनिवार्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकरण समितीने पीक समुहांसाठी 'लेबल क्लेम'ची आंतरराष्ट्रीय पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पिकांच्या प्रकारानुसार आणि रसायनांच्या गरजेनुसार गट बनवण्यात आले आहेत. त्याप्रमाणे शिफारस केलेल्या कीटकनाशकांचाच वापर शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. 'लेबल क्लेम' पद्धतीमुळे रासायनिक कीटकनाशकांच्या वापराला कायदेशीर आधार मिळणारे आहे. यामध्ये एकूण पीक समुह 23, एकूण पीक उपसमुह 68 आणि पिकांची एकूण संख्या 554 इतकी आहे.