नागपूर : श्रीनभ अग्रवाल या विद्यार्थ्याने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभुतपूर्व कामगिरी केल्यामुळे श्रीनभ अग्रवाल याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातील विविध राज्यांच्या मुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोर वयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते.
कोरोनाच्या महामारीमुळे यंदा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडला. श्रीनभ अग्रवाल हा नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता.
श्रीनभने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रीपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे.
‘आयआयटी कानपूरचे’ भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रम देखील श्रीनभने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणसंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील त्याच्या नावाची नोंद झाली आहे. श्रीनभ सध्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगलोर येथे प्रथम वर्षात (बीएस/रिसर्च) शिक्षण घेत आहे.
महत्वाच्या बातम्या
- MPSC Exam : राज्यसेवा पूर्वपरीक्षेदरम्यान नागपुरात गोंधळ, अभाविपचं आंदोलन, पेपर फुटला नसल्याचं MPSCकडून स्पष्टीकरण
- Raghuram Rajan on Economy : सरकारने काळजीपूर्वक खर्च करावा, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्ला
- US Canada Border : चार भारतीयांचा गोठून मृत्यू, बेकायदेशीरपणे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न
- Digital India : सर्व सरकारी योजनांसाठी एकच डिजिटल प्रोफाईल, ऑगस्टपासून सुरू होणार ‘सिंगल साईन ऑन’ पोर्टल