Zero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी
लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट लक्षात घेऊन आपल्या शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप नेते अमित शाहांशी बोलताना केल्याचं समजतं. लोकसभेला आम्ही तुमचं ऐकलं, काही जागांवरील आमचे उमेदवारही बदलले, मात्र आता परिस्थिती थोडी वेगळी आहे, त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्या पाहिजेत, अशी काहीशी ताठर भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतल्याचं समजतं. महायुतीनं आतापर्यंत १८२ जागा जाहीर केल्या आहेत. म्हणजेच महायुतीतल्या जागावाटपात अजूनही १०६ जागांचा अंतिम निर्णय अजूनही प्रलंबित आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शाहा यांच्यासोबत बैठक घेऊन महायुतीचे हे तीन नेते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटपाचाही अंतिम निर्णय हा अमित शाहाच घेणार आहेत. शाह हे वाटाघाटींमध्ये आपला मुद्दा सहज सोडत नाहीत असं म्हणतात. गेल्या दहा वर्षांत अनेक राज्यांमधील पक्षांशी वाटाघाटी करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यानं बार्गेन करण्यात शाह तरबेज आहेत.