Zero Hour : EVM वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतं ? 'मविआ'त मतमतांतर?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : EVM वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतं ? 'मविआ'त मतमतांतर?
तुम्ही पाहताय झीरो अवर.. आता पुढची दहा मिनिटं... आज दिवसभरातली सगळ्या महत्वाच्या राजकीय घडामोडी... मंडळी.. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया आठवतायत का? महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय विरोधकांनी मतदारांना नाही तर ईव्हीएमला दिल्याचं आपण पाहिलं.. काही जणांनी तर अगदी कोर्टात जाण्याचीही तयारी केली... अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी मोठी रक्कमही आयोगात भरली.. पण निकाल काही बदलला नाही.. उलट.. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ईव्हीएमविरोधात सुरु केलेलं देशव्यापी आंदोलन हळूहळू थंड पडत गेलं.. जम्मूचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेसला ईव्हीएमच्या नावानं ओरड बंद करावी असा सल्लाही दिला.. पण इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या.. ईव्हीएम टॅम्पर करणं असो... की मतदानात फेरफार असो.. सगळ्यात जास्त आरोप झाले ते याच ईव्हीएमवर.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल... की मी ईव्हीएम पुराण का सांगतोय.. त्याला कारण आहे... शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची दोन वक्तव्यं.. पहिलं कालचं आणि दुसरं आजचं... ठोस माहिती असल्याशिवाय ईव्हीएमला दोष देण्यात काहीही अर्थ नाही.. मी स्वत: त्याच ईव्हीएमवर चार वेळा खासदार झालेय... असं म्हणत सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमला जवळपास क्लीनचीट दिली... असं म्हणायला हरकत नाही..