Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

एबीपी माझा वेब टीम  |  09 Jan 2026 06:33 PM (IST)
ABP News

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत 


मुंबईचा विकास होईल. पण मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहण्याची गरज आहे. मुंबईचं वर्णन 'स्टेट विदिन स्टेट' असे केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई ही मराठी माणसाच्या (Marathi Manus) हातात आहे. पण भविष्यात हे चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. ते शुक्रवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भविष्यात संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलला जाऊ शकतो, याची सविस्तर मांडणी केली. (Mumbai Mahanagarpaliaka Election 2026)


मला 2024 ते 2025 यादरम्यान एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने मला मुंबईत आगामी काळात होऊ घातलेल्या गोष्टी आणि आराखडा ऐकून मी हबकून गेलो. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना इतका उशीर त्यासाठीच झाला. कारण राज्य सरकारला काही गोष्टी या प्रशासकामार्फत करुन घ्यायच्या होत्या. निवडणूक होऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार आल्यावर त्रास नको म्हणून या सर्व गोष्टी आधीच करायच्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारचा सर्व फोकस हा एमएमआरए रिजनवर आहे.  याचं छोटसं उदाहरण मी सांगतो. वाढवण बंदर झालं, ती गरज होती, हे मी समजू शकतो. पण आता वाढवण बंदराच्या बाजूला एअरपोर्टही होत आहे. वाढवण विमानतळ कशासाठी बांधले जात आहे तर इथून मुंबईचा कार्गोचा सगळा भाग तिकडे शिफ्ट केला जाईल. यानंतर नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे तिकडे सध्या मुंबईतून होत असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक शिफ्ट केली जाईल. सध्या मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींच्या ताब्यात आहे. वाढवण आणि नवी मुंबई विमानतळामुळे या विमानतळाची गरज संपुष्टात येईल. तसे झाली की धारावी आणि कलिना परिसराला लागून असलेला मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींना विकला जाईल. आपण हा सगळा परिसर गुगल मॅपवर पाहिल्यावर लक्षात येईल की, या भागात शिवाजी पार्कसारखी 50 ते 60 मैदान बसू शकतात. तोच प्लॉट राज्य सरकार विकायला काढणार आहे. मला 100 टक्के वाटते, सध्याच्या मुंबई विमानतळाच्या जागेची विक्री होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA