Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

Continues below advertisement

Uddhav Thackeray : भाजपचं हिंदुत्व हे खरं आहे की चुनावी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटला आणि प्रभू रामचंद्र जिथं तपश्चेला बसले होते, तेथील सगळी झाडं जर कापली तर आम्ही काय सांगणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला. देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. पण ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत ते आमची पोरं दत्तक घेतायेत ते काय शहरं दत्तक घेणार? असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. भाजप हा उपटसुंभांचा पक्ष झाला आहे. आमचं व्यासपीठ हाऊसफुल आहे. आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. मोठे केलेले गेली असतील पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं सोबत असल्याचे ठाकरे म्हणाले. 

पक्ष चालवायला भाजपला बरबटलेली माणसं चालतात 

पक्ष चालवायला भाजपला बरबटलेली माणसं चालतात. त्यांना डोक्यावर नाचवताय असे ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तेच तिकडे गेले. वाईट निष्ठावान कार्यकर्त्यांचे वाटत आहे. देवयानी ताई यांच्याबाबत मला आदर आहे. त्यांना रडू आलं. तुमची निष्ठा ज्या पक्षाशी आहे, तो पक्ष आज उपऱ्यांचा दलालांचा पक्ष झाला आहे. शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाडे नाहीत असे मुनगंटीवार म्हणाले. भाजपमध्ये चोर दरोडेखोर येतात. राणालासुद्धा भाजपमध्ये घेतील एवढे निर्लज्ज झालेत. भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होते. भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? असा सवाल ठाकरेंनी केला. भाजपने त्यांच्या फडक्या वरील हिरवा रंग काढावा आणि नंतर आम्हाला हिंदुत्व विषयी बोलावं असे ठाकरे म्हणाले. 

ठाकरे जे बोलतात ते करतात

ठाकरे बोलतात ते करतात. मशाल तुमच्या हदयात पेटली पाहिजे. राहुल नार्वेकरविधानसभा अध्यक्ष आहे. तो निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे. भाजप मात्र, त्यांच्याघरात तीन तीन उमेदवार देते. पण यांनी काहीही गकेलं तरी चालते. निवडणूक आयोग शेपूट घालून बसले आहे. आज आपण सावध झाला नाहीतर गुलामीत राहावं लागेल. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोत. तुमच्या विकासासाठी आण्हाला सत्ता पाहिजे असे ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola