Zero Hour : मनोज जरांगे 3 तारखेला मोठी घोषणा करणार; तिरंगी, चौरंगी लढत रंगणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : मनोज जरांगे 3 तारखेला मोठी घोषणा करणार; तिरंगी, चौरंगी लढत रंगणार?
आजच्या भागात आपण, याच बंडखोरीवर औषध शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या बातम्या पाहणार आहोत. महायुती असो की महाविकास आघाडी. दोन्ही ठिकाणी २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार ठरवण्याचं टेन्शन होतं. ते टेन्शन दूर झालं आणि आता त्यांच्यासमोर अनेक मतदारसंघात बंडखोरी शमवण्याचं टेन्शन आहे. त्यासाठीही हातात अवघे चार दिवस आहेत. कारण विधानसभा निवडणुकीसाठी वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळंच की काय शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांपासून काँग्रेस प्रभाऱ्यांपर्यंत सगळ्याच नेत्यांची आजची दिवाळी पहाट नाराज आणि बंडखोर नेत्यांच्या घरी गेली. किंवा त्यांच्याशी फोनवरुन बोलण्यात गेली.
एक ढोबळ आकडा पाहिला तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये शंभरपेक्षा जास्त बंडखोरांनी आपल्याच अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकलाय.
प्रमुख आणि चर्चेतील बंडखोरांच्या यादीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली मतदारसंघात, तर छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. भाजपच्या माजी खासदार हिना गावीत यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. आणखीही काही प्रमुख बंडखोरांची नावं आपण आजच्या भागात पाहणार आहोत.