Zero Hour : राहुल गांधी पुन्हा अमेठीच्या मैदानात , भाजपच्या स्मृती इराणींचं आव्हान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : राहुल गांधी पुन्हा अमेठीच्या मैदानात , भाजपच्या स्मृती इराणींचं आव्हान
उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघ... हा गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ.. १९६७ सालपासून झालेल्या सगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये फक्त तीन वेळाच इथून बिगर काँग्रेसी उमेदवार विजय झालाय.. १९८० साली याच अमेठीतून राहुल गांधींचे काका संजय गांधी खासदार झाले.. त्यानंतर चारवेळा राजीव गांधी, एकदा सोनिया गांधी आणि नंतर सलग तीन वेळा राहुल गांधी याच अमेठीतून खासदार बनले.. मात्र, २०१९ साली राहुल गांधींना हा गड भाजपच्या स्मृती इराणी यांनी उद्ध्वस्त केला... खरंतर, त्यांनी २०१४ सालीही राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवली होती.. मात्र, त्यात त्यांना लाखभर मतांनी पराभव स्विकारावा लागला होता.. मात्र, स्मृती इराणींनी मतदारसंघ सोडला नाही.. त्यांनी पाच वर्ष अमेठीतच ठाण मांडलं.. आणि त्यांच्या परिश्रमाला मतदारांना साथ दिला.. आणि २०१९ साली स्मृती इराणींनी राहुल गांधींना ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी मात दिली... यावेळीही भाजपनं स्मृती इराणींनाच उमेदवारी दिलीय.. इतकंच नाही तर त्यांनी नुकताच उमेदवारी अर्जही दाखल केलाय.. अमेठीत पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे.. त्याला अवघे १८ दिवस उरलेले असतानाच.. काँग्रेसकडून मात्र उमेदवार चाचपणीच सुरु होती.. त्यातच आज अमेठीतील काँग्रेस कार्यालायत हालचाली वाढल्या... आणि राहुल गांधी अमेठीतून लढणार... अशा चर्चांनी जोर धरला.. इतकंच नाही तर काँग्रेसच्या अमेठी जिल्हा अध्यक्षांनी राहुल गांधींच्या नावानं उमेदवारी अर्जही घेतलाय... राहुल गांधींनी २०१९ साली वायनाडमधूनही उमेदवारी भरली होती.. तिथून ते खासदारही झाले.. यावेळीही राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून अर्ज भरला.. आणि तिथलं मतदानही पार पडलंय..
दुसरीकडे राहुल गांधींनी याआधीही अमेठीचा निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटी आणि पक्षाध्य़क्ष घेतील.. असं स्पष्ट केलं होतं.. मात्र, आजच्या चर्चांचं नीट विश्लेषण केलं.. तर राहुल गांधीच अमेठीतून उमेदवार असण्याची शक्यता सर्वाधिक बळावते.. अवघ्या काही तासांमध्ये अमेठीचा सस्पेन्स संपलेला असेल..
तसंच सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून प्रियंका गांधी लढणार असल्याची चर्चाय... उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे.. त्यामुळे प्रतिक्षा अवघ्या काही तासांची..