Zero Hour : Jalna Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कचरा,धूळ,पाणीटंचाई...जालन्यातील गंभीर प्रश्न

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे जालना. जालना... सोने का पालना अशी म्हणच आहे मराठवाड्यात. पण तरीसुद्धा या शहराला अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर झालं असलं तरी स्थानिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडलेला नाही. महापालिकेचे महामुद्दे या आपल्या विशेष सत्रात आज आपण जालना शहरातील याच समस्यांवर प्रकाशझोत टाकणार आहोत. पाहूयात एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट.
जालन्यात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची. जालन्यात आजही आठ दिवसांनी एकदा पाणी येतं, आणि जेव्हा येतं ते देखील स्वच्छ पाणी नसतं. जालन्याला जायकवाडी धरणातून पुरवठा होतो. २०२४मध्ये तर पाऊस देखील चांगला झाला, धरण काठोकाठ भरलं. मात्र नियोजनाच्या अभावापायी अनेक वर्षांपासून आठ दिवसाआडच पाणी येतंय.
पाणीपुरवठा वाढवण्यासाठी अधिक निधीची गरज आहे, असं महापालिका आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले. निधी कमी पडण्याचं एक कारण हे देखील आहे की जालन्यात अधिकृत आणि अनधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या जवळपास सारखीच आहे. म्हणजे अधिकृत नळ कनेक्शनची संख्या आहे १८ हजार ७७१. तर बेकायदेशीर नळजोडण्यांची संख्या ३० ते २५ हजारांच्या घरात आहे. म्हणजेच अर्ध जालना पाणीपट्टी भरतच नाही.
केवळ पाणीपट्टीच नाही तर मालमत्ताची थकबाकी देखील मोठी आहे. ४२२ कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या जालना महापालिकेला केवळ मालमत्ता करामधून १२० कोटींचं येणं आहे. त्यासाठी पालिकेनं वसूली आणि जप्ती मोहीम देखील हाती घेतलीये.
येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याआधी जर किमान पाण्याचा प्रश्न सोडवला तर ठीक, नाहीतर जनता या राजकारण्यांना मतांबाबत कोरडं ठेवेल यात शंका नाही. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना.