Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
आठ-नऊ वर्षांतर निवडणुकांसाठी नशिब आजमावण्याचं म्हणून पक्षांची काम करणारे.. हे सगळे यंदाही इच्छुकच राहिलेत! आणि बहुतेक प्रत्येक जण मनात आज हेच गाणं गात असावेत.. (बरं, त्यांना उमेदवारी का नाही मिळाली तर कारणं अनेक असावित पण प्रमुख दोन कारणं... एकतर, त्यांच्या वार्डात एकतर पक्षांना दुसऱ्याला उमेदवारी दिलीय.. किंवा तो वॉर्ड मित्रपक्षाच्या वाट्याला गेलाय.) (काहीही असो.. हे कार्यकर्ते पुढच्या पाच वर्षांसाठी कार्यकर्तेच राहतील... कार्यकर्त्यांचं सोडा.. मित्रपक्षांमध्येही मोठ्या कुरबुरी आज झाल्यात.. जितक्या ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांचा उद्रेक दिसलाय.. तितक्या ठिकाणी मित्रपक्षांमध्येही फाटफूट झालीय.) (२९ महापालिकांपैकी जवळपास १५ महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेत फूट पडलीय.. तर मुंबई, पुणे, पिंपरीसह बहुसंख्य ठिकाणी दादांच्या राष्ट्रवादीनंही महायुतीतून वेगळी वाट धरलीय.) (महाविकास आघाडीतही काँग्रेसनं आधीच वेगळी वाट धरली होतीच. पण, पुण्य़ात मात्र, त्यांनी ठाकरे ब्रदर्स सोबत घेतलेत.)(आता तुलनाच करायची म्हंटली तर महायुतीला जितके तडे गेलेत तिकडे महाविकास आघाडीत गेल्याचं दिसून आलं नाही.. अगदी तसंच नाराज उमेदवारांचा उद्रेकही महायुतीच्याच कार्यलयांमध्ये जास्त दिसला.) (पण, त्याचा खरंच, राजकीय फटका बसतो का? महापालिकांच्या निकालांवर याचा काही परिणाम होतो का? हे १६ तारखेलाच कळेल.. पण, आजच्या भागाची सुरुवात पहिल्या प्रश्नानं.. त्यासाठी जावूयात पोल सेंटरला).