Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या थारवर चारजण मारहाण करण्यासाठी तुटून पडले. यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. इम्तियाज जलील यांची पदयात्रा जात असताना छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या थारवर हल्ला करण्यात आला. यावेळी थारमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या इम्तियाज जलील यांचा हात ओढून चार जणांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बायजी क्रमांक गल्ली 20 मध्ये रॅली सुरु होती, त्यावेळी कलीम कुरेशींच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवले गेले. त्यानंतर काही काळ शांत वातावरण होतं. पुन्हा रॅली पुढं गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचं सांगितलं गेलं. दोन्ही घटना नाराज कार्यकर्त्यांनी केल्याचा, कलीम कुरेशी आहेत, त्यांच्याकडून प्रकार केला गेल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.