Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या थारवर चारजण मारहाण करण्यासाठी तुटून पडले. यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. इम्तियाज जलील यांची पदयात्रा जात असताना छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार कलीम कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या थारवर हल्ला करण्यात आला. या मारहाणीनंतर इम्तियाज जलीलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या समोर हल्ला झाला. खुनी लोकांची हिम्मत इतकी वाढली आहे. रीतसर परवानगी घेऊन रॅली काढण्यात आली. पीआय आणि संपूर्ण पोलीस फोर्स तिथे होते. आता ते काय कारवाई करणार हेच आम्ही पाहतोय. अशाप्रकारे गुंडागिरी करून निवडणूक लढता येत नाही. अशाप्रकारची गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिलं आहे. पोलिसांनी कारवाई नाही केली, तर एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू. अतुल सावे आणि संजय शिरसाटांचे गुंड आहेत ज्यांनी हा हल्ला केला आहे. सावे आणि शिरसाटांनी पाळलेले गुंड आहेत, असा आरोप जलीलांनी केला आहे.