Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. महापालिका निवडणुकीत च्या रिंगणात थेट नऊ महिने गरोदर असणारी उमेदवार काँग्रेस पक्षाकडून लढा देत आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून गीतांजली हवालदार या काँग्रेसच्या उमेदवारासून त्या अवघडलेल्या अवस्थेतच या निवडणुकीला सामोरे जात आहेत. गीतांजली हवालदार यांना आपल्या प्रभागाच्या विकासासाठी ही निवडणूक लढवायची आहे. स्वतः बीए डीएड शिक्षण घेतलेल्या गीतांजली हवालदार आपल्या कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंबावर अनेक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्या या निवडणुकीत उतरलेल्या आहेत काहीही झालं तरी मी हा प्रचार करणार आणि निवडून ही येणार अशी जिद्द त्यांची आहे... गीतांजली हवालदार यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...