Zero Hour Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडे गजाआड

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : घाटकोपरमधील दुर्घटना (Ghatkopar Hording Collapsed) घडल्यानंतर याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं आहे. वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु असून भिंडे राज्याबाहेर पळाल्याचा संशय आहे. भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळले. त्यानुसार मुंबई पोलीसांची टीम तिथे पोहचली. मात्र त्यापूर्वीच भिंडे पसार झाला होता.
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला आहे. भिंडेच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच त्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.