Zero Hour Full : लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे ?
महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा ४८... पण पक्ष भरमसाठ.. आधी बरं होतं.. युतीत शिवसेना-भाजप.. आणि आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी.. पण गेल्या दोन वर्षांत शिवसेना-राष्ट्रवादीच्या फाटाफुटीमुळे प्रत्येकी एकाचे दोन झाले.. सत्तेत येण्यासाठी फायदा झाला.. पण म्हणतात ना की नाण्याला दोन बाजू असतात.. तीच दुसरी बाजू जागावाटपावेळी समोर आली.. पक्ष वाढले आणि नाराजी हि वाढली .. दोन्ही बाजूला .... अजूनही महायुतीत अद्यापर्यंत भाजपने २४, शिवसेनेने ८ आणि राष्ट्रवादीने ४ उमेदवार दिले.. असे एकूण ३६ जागांवर नाव फायनल झालाय ... तरी १२ जागांवर उमेदवाराचा पत्ता नाही.
तिकडे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १७, काँग्रेसने १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ५ असे एकून ३४ उमेदवार जाहीर केले.. उरल्या १४ जागा ... तिढा मात्र १४ पेक्षा हि जास्त जागांचा सांगितलं जातोय कारण एकाने दिलेला उमेदवार दुसऱ्याला मान्य नाही... आणि म्हणूनच जशी या उर्वरीत जागावाटपांची उत्सुकता राजकीय पक्षांना आहे, तशीच उत्सुकता जागरूक मतदारांनाही असणार आहे...
आज महायुतीला निवडणुकीत अधिकृत चौथा मित्र मिळाला. निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी, ऐन निवडणुकीत यु-टर्न घेतला.. आणि परभणीसाठी उमेदवारी मिळवली.. त्याची बरीच चर्चाही रंगली होती.. खरंच नाराजी दूर झाली का माहिती नाही ... पण जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव उपस्थित होते..आणि त्यामुळे विरोध दूर झाल्याचे चित्र तरी दिसले. परभणीचे जागा जरी राष्ट्रवादीची असली, तरी मतदारसंघात ताकद भाजपची आहे.. अशी शक्यता होती की कदाचित जानकर राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवतील.. पण महादेव जानकरांंनी स्वतःच्या रासपच्या एबी फॉर्मवरच अर्ज भरलाय.. शिट्टी, रोड रोलर किंवा सफरचंद या तीन चिन्हापैकी एका चिन्ह जानकर घेणार आहेत.