Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी

Continues below advertisement

Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली असून उद्या सायंकाळी साडे पाच वाजता शपथविधी आहे. देवेंद्रजींनी आपल्याला निमंत्रण दिलं आहे. मी देखील तुम्हाला आमंत्रित करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी इथंच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही दिलं आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भाजपच्या उमेदवाराला, देवेंद्रजींना देऊन टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा जो निर्णय घेतील त्यांना पाठिंबा असेल अशी भूमिका मी यापूर्वीच घेतली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता, त्यामुळे मी अगदी मनमोकळेपणानं माझी भूमिका स्पष्ट केली, असं शिंदेंनी म्हटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram