Zero Hour Full : अमित शाहांचा नागपूर दौरा ते अक्षय शिदेचा एन्काऊंटर झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझीरो अवरची सुरुवात करुयात राजकीय पटलावर घडलेल्या एका महत्वाच्या बातमीनं.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी किती जोरदार तयारी केलीय, हे आपल्याला रोज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमधून आणि राजकीय यात्रांमधून लक्षात येतं.
त्याच राजकीय कार्यक्रमांमध्ये आज सर्वात जास्त चर्चेत होता तो भाजपचा कार्यकर्ता मेळावा. आणि त्यात झालेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं मार्गदर्शन.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विदर्भ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अमित शाहांनी या मेळाव्यात कानमंत्र दिला. तोच कानमंत्र आपण पाहणार आहोतच. पण त्या मेळाव्यातील इनसाईड स्टोरीही ऐकणार आहोत. पण आजच्या मेळाव्यात एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आली ती म्हणजे नागपुरात भाजपच्या मंचावरची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अनुपस्थिती.
अमित शाह नागपुरात पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथं होते.. मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार आणि भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेही होते.
पण मंचावर नव्हते ते नागपूरचे खासदार, भाजपचे माजी अध्यक्ष आणि केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या इतक्या महत्वाच्या दौऱ्यावर आलेत.. नेमके त्याचवेळी नितीन गडकरी हे नागपूरपासून एक हजार ८०० किलोमीटर दूर जम्मू काश्मीरात होते.. बरं, ते काही फॅमिली व्हॅकेशनसाठी तिथं गेलेले नाहीत. तर जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजित प्रचारासाठी गडकरी तिथं गेलेत...
पण आता अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा... आणि नितीन गडकरींचा काश्मीर दौरा.. या दोन्हीच्या तारखा एकच.
हा निव्वळ योगायोग म्हणावा... की आणखी काय... प्रश्न तर आहे.. आणि त्यानिमित्तानं आज दिवसभरात रंगलेल्या चर्चांवरच आहे आपला पहिला प्रश्न.
`````````````
झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. पहिल्या सत्रात आपण अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या बैठकीबद्दलच्या राजकीय बातम्या तपशिलात पाहिल्या. आता वळूयात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाकडे. बदलापूरमधील शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्याचं काल ठाणे शहराजवळच्या मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आलं. या घटनेवर अनेकांनी, चिमुरडीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली.
तर राज्य सरकारसाठी मात्र या एन्काऊंटरमुळं वेगळी राजकीय अडचण निर्माण होतेय की काय, असा प्रश्न पडतो. कारण विरोधकांनी या एन्काऊंटरवरून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. यामध्ये प्रमुख प्रश्न दोन. पहिला प्रश्न असा की शाळाचालकांना वाचवण्यासाठी हे एन्काऊंटर करण्यात आलं का? आणि दुसरा प्रश्न आहे अक्षय शिंदेवर गोळ्या फायर केल्या त्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्याबद्दल. संजय शिंदेंची कारकीर्द वेळोेवेळी वादग्रस्त ठरलीय. ड्रग्जच्या तस्करीत मदत करण्यापासून एका कुख्यात गँगस्टरला पळून जाण्यात मदत करेपर्यंतचे आरोप त्यांच्यावर झालेत.
यासह संपूर्ण प्रकरणात घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.. पण, त्याआधी पाहुयात आजचा दुसरा प्रश्न.. आणि त्यासाठी जावूयात पोल सेंटरला..